महाराष्ट्राचा भूगोल: स्थान व विस्तार व त्यावरील प्रश्न व उत्तरे
महाराष्ट्र जिल्ह्याच्या भूगोलामध्ये प्रामुख्याने तिची भौगोलिक स्थिती क्षेत्र आणि प्रदेश निहाय विभाग तसेच नद्या हवामान नाती पिके सलकृती आणि वनस्पती तसेच प्राणी यांचा समावेश असतो . महाराष्ट्र राज्य हा भारताच्या पश्चिम द्वीप प्रकल्पातील प्रदेश व एक प्रमुख राज्य आहे ज्याचे दख्खन भागातील पठाराचा महत्त्वाचा व मोठा भाग व्यापलेला आहे हे आपण महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती व स्थानानुसार बघणार आहोत जे की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असा महत्त्वाचा विषय आहे.
महाराष्ट्र यावरील स्थान व विस्तार वरील प्रश्न उत्तरे
महाराष्ट्र स्थान व विस्तारा वरील प्रश्न उत्तरे भाग :एक महाराष्ट्र राज्य हा भौगोलिक स्थितीप्रमाणे भारताच्या पश्चिम द्वीप्रकल्पातील एक राज्य आहे तसेच भौगोलिक दृष्ट्या पाच प्रदेशांनी मिळून बनलेला आहे या पाच प्रदेशांमध्ये कोकण पुणे नाशिक मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे औद्योगिक आणि आर्थिक केंद्रापैकी एक आहे त्याचा देशावर मोठा सामाजिक आणि राजकीय प्रभाव पडतो. या सर्व भौगोलिक परिस्थितीवर विविध प्रकारचे प्रश्न हे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विचारले जातात पुढील भागात आपण मोठ्या प्रमाणावर विचारल्या जाऊ शकणारे प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत.
1)महाराष्ट्र राज्याचे भारतात स्थान कुठे आहे?
उत्तर:- उत्तर गोलार्धातील भारताच्या पश्चिम भागात
2)कोणत्या दोन भूभागास एकत्रित आणणारी भूमी ही महाराष्ट्र राज्य आहे ?
उत्तर:- उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारे विशाल भूमी आहे. 3)महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे?
उत्तर:- महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार: – १५’३७ उत्तर अक्षांश ते २२’६ उत्तर अक्षांश
4)महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे?
उत्तर:- महाराष्ट्राचा रेखांशाचा विस्तार: – ७२’३६ पूर्व रेखांश ते ८०’५४ पूर्व रेखांश.
5)महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम विभागाची लांबी किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 800 किलोमीटर
6)महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण भागाची लांबी किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 720 किलोमीटर
7)महाराष्ट्र राज्याची दक्षिण व उत्तर लांबी किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 560 किलोमीटर
8)महाराष्ट्र राज्याची एकूण सागरी किनारा किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 720 किलोमीटर
9)महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर:-3,07,713 चौरस किलोमीटर
10)महाराष्ट्र राज्याने देशाचा किती भाग व्यापला आहे?
उत्तर:- 9.36%
11)महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो?
उत्तर:- तिसरा
12)महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर:- दुसरा
13)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा नंबर लागतो?
उत्तर:- सातवा
14)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे?
उत्तर:- राजस्थान
15)राजस्थान राज्याची एकूण क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर:- तीन लाख 42 हजार 239 चौरस किलोमीटर
16)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या नंबरचे राज्य कोणते आहे?
उत्तर:-मध्य प्रदेश
17)मध्य प्रदेश राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर:-3,08,346 चौरस किलोमीटर
18)लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा नंबर लागतो?
उत्तर:- पहिला
19)महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण आकार कसा आहे?
उत्तर:- उलटा त्रिकोणी कृती आहे
20)महाराष्ट्र राज्याचा दक्षिणेकडे भाग कसा आहे?
उत्तर:- दक्षिणेकडे तो चिंचोली होत गेला
21)महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील भाग कसा होत आहे?
उत्तर:- उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे
22)महाराष्ट्राचा पाया कुठे आहे?
उत्तर:- महाराष्ट्राचा पाया कोकणात आहे.
23)महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे?
उत्तर:- गोंदिया जिल्हा
24)महाराष्ट्राचे निमुडते टोक कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:-गोंदिया जिल्हा
25)महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस कोणता जिल्हा कोणता राज्य आहे उत्तर:-गुजरात राज्य
26)महाराष्ट्र राज्याच्या वायव्य असणाऱ्या राज्याला किती जिल्ह्यांची सीमा आहे?
उत्तर:- चार जिल्हे व एक केंद्रशासित प्रदेश
27)गुजरात राज्याला कोणत्या चार जिल्ह्यांच्या सीमा एक आहे?
उत्तर:- 1)पालघर 2)नाशिक 3)धुळे 4) नंदुरबार
28)महाराष्ट्र राज्याच्या वायव्य असणारे राज्य ला कोणत्या केंद्रशासित प्रदेश सीमा एक आहे?
उत्तर:- दीव व दमण
29)दीव व दमन या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्रातील कोणत्या राज्य कोणत्या जिल्ह्याचे सीमा लागते?
उत्तर:- पालघर जिल्ह्याची
30)महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे?
उत्तर:- मध्य प्रदेश
31)महाराष्ट्र राज्य मध्य प्रदेश यांच्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सीमा एक आहे?
उत्तर:- आठ
32)महाराष्ट्र राज्याची मध्यप्रदेश राज्य सोबत कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा एक आहे?
उत्तर:- 1)नंदुरबार 2)धुळे 3)जळगाव 4)बुलढाणा
5)अमरावती 6)नागपूर 7)भंडारा 8)गोंदिया
33)महाराष्ट्राच्या आग्नेय कोणते राज्य आहे?
उत्तर:- तेलंगणा राज्य
34)महाराष्ट्राच्या आग्नेय असलेल्या राज्यासोबत महाराष्ट्राचे किती जिल्ह्यांची सीमा आहे?
उत्तर:- 4 जिल्हे
35)महाराष्ट्राच्या आग्नेय असलेल्या राज्यासोबत महाराष्ट्राचे कोणते कोणते जिल्हे आहेत?
उत्तर :- 1)गडचिरोली 2)चंद्रपूर 3)यवतमाळ 4)नांदेड
36)महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
उत्तर:- कर्नाटक राज्य
37)कर्नाटक राज्य सोबत महाराष्ट्राची किती जिल्ह्यांची सीमा एकत्र आहे?
उत्तर:- सात जिल्हे
38)महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यामध्ये असणारे सात जिल्हे कोणकोणते आहेत?
उत्तर:- 1)नांदेड 2)लातूर 3) उस्मानाबाद 4)सोलापूर 5)सांगली 6)कोल्हापूर 7)सिंधुदुर्ग
39)महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
उत्तर:- गोवा
40)गोवा या राज्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? उत्तर:- एक
41)गोवा या राज्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? उत्तर:- सिंधुदुर्ग जिल्हा
42)महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे?
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग
43)सातपुडा पर्वताची पश्चिम पूर्व एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 900 किलोमीटर
44)सातपुडा पर्वत रंगाची एकूण रुंदी किती किलोमीटर आहे?
उत्तर:- 160 किलोमीटर
45)महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत?
उत्तर:- 1)नांदूरबार 2)धुळे 3)जळगाव 4)बुलढाणा 5)अमरावती 6)नागपूर 7)भंडारा 8)गोंदिया जिल्हा
46)महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस कोणती जिल्हे आहेत?
उत्तर:- 1)गोंदिया जिल्हा 2)गडचिरोली जिल्हा
47)महाराष्ट्र राज्याच्या वायव्यस कोणते जिल्हे आहेत?
उत्तर:- 1)पालघर 2)नाशिक 3)धुळे 4)नंदुरबार जिल्हा